श्री रंग बावनी | Shree Rang Bavani Marathi Lyrics | Powerful prayer of Shri Rang Avadhut Maharaj 52 Lines of Bliss

shri rang avadhut maharaj rang bavani श्री रंग बावनी मराठी

नमस्कार . श्री रंग अवधूत महाराज ह्यांच्या कृपा प्रसादे हि रंग बावनी प्रस्तुत केली आहे. तरी आपण आपल्या सह बांधवा सह हि पोस्ट शेर करू त्यांना हि ह्याचा लाभ द्यावा.ह्याची एक PDF सुद्धा बनवून मिळेल.

ब्रह्मानंदि निमग्न शांत भगवन् ज्ञानेश योगीश्वर ।
रेवातीरीं निवासी संत हृदय श्रीदत्त सिध्धेश्वर ।।
भावातीत भवाब्धितारक गुरु श्रीरंग स्वामी प्रभू |
वासुदेव पदी सदा नत असे श्रीरंग भावे नमू ।।

।।अवधूत चिंतन श्री । गुरुदेव दत्त ।।
।।सदा शुद्धचित्ती स्मरू रंग दत्त ।।
।। ૐ श्रीरंग प्रसन्नोSस्तु ।।

जय सदगुरु रंग अवधूता । नित्य निरामय श्रीदत्ता । मम माता तू बंधू पिता । सखा सोयरा हितकर्ता ।। १।।
सदैव वाहसी मम चिंता । तू माझा पालन कर्ता । अवखळ जरि भाविक परि । श्रद्धेने भजतात हरि ।।२।।
त्यांच्या कल्याणासाठी । संत महंतांचे पोटी । निर्गुण होते साकार । परब्रह्म घे अवतार ।।३।।
विठ्ठल बाबा तपोनिधान । रुक्मांम्बा सात्विक महान । केवळ त्यांना करुनि निमित्त । अवतरले प्रभू श्रीगुरुदत्त ।।४।।

शुद्धपक्ष कार्तिकात । नवमी प्रदोष काळात । प्रगटे गोध्रा गावात । भाविक गुर्जर प्रांतात ।।५।।
पांडुरंग नामे नटला । नारेश्वराचा नाथ भला । ब्रह्मा शिव विष्णू अवतार । भक्तांना करण्या भवपार ।।६।।
शांत दांत योगी श्रेष्ठ । ब्रह्मनिष्ठ अन तपनिष्ठ । निबिडारण्यी वास करी । नारेश्वरी रेवा तीरी ।।७।।
स्वर्ग लोक पृथ्वी वरती । प्रांतोप्रांती हि ख्याती । सद्भक्तांना ये प्रचिती । नित्य दर्शनासी येति ।।८।।

भाविक श्रद्धेने करती । अनुष्ठान स्थानावरती । त्वरित तयांना फलप्राप्ती । आणि मिळते चिरशांती ।।९।।
चिन्मय मंगल नाम तुझे । दत्त दिगंबत दयानिधे । अपराधी मी पतित जरि । सेवक आश्रित तुझा परी ।।१०।।
अज्ञानी मी मूढ जरी । भक्त तुझा रे खरा परी । पुजातंत्रि अजाण जरी । भावे पूजा करी परी ।।११।।
श्रद्धेने भजतो नित्य । तव पदी स्थिर ठेउनी चित्त । लीले जे पूजा करिती । त्यांना होते तव प्राप्ती ।।१२।।

सकळ मनेप्सीत मिळताती । अन्ती मिळते मोक्षगती ।श्रेष्ठी ऐसें वदताती । कोडे मज मी मंदमति ।।१३।।
फेडी माझी हि भ्रांती । तोवरी नसू दे विश्रांती । अगाध लीला तू करिशी । कुंठित मति वर्णायासी ।।१४।।
भवानी शंकर शास्त्रींना । पिंडीत दर्शन दिलेस ना । कागद दिधले काकांना । यवन वेष तू धरुनी ना ।।१५।।
मग आता तू गप्प कसा । असशील येईल त्वरे तसा । डायाभाईचा विस्फोटक । जयाबेन चा आजार अंतक ।।१६।।

बाबुभाईचा ताप भयंकर । घालविले तुज स्मरता तत्वर । मंगललाला कडे किती । जेउनि उरले अन्न अति ।।१७।।
ऐशा लीला नित्य किती । केल्या त्यांना नाही मिती । जे तुज श्रद्धेने भजती । त्यांना काय कमी जगती ।।१८।।
जीवन रंगी रंगविले । ज्यांनी त्यांना तू दिधले । सुख धन आणि जे भोग्य । यश किर्ती आयुरारोग्य ।।१९।।
मनकवडा म्हणतात तुला । जाणुनी दे मम मजसी मला । विनम्र लिंबाचे झाड । तुझ्या कृपे पाने गोड ।।२०।।

वृक्षलताही उद्धरती । म्हणुनी मजला नाही क्षिती । गाता तव मंगल कीर्ती । होईल झणी इच्छा पूर्ती ।।२१।।
सिद्धी साऱ्या होतील दास । करतील पायी नित्य निवास । पापे त्वरित जळतील । वांछित प्राप्तही होईल ।।२२।।
विश्वासा या ठेवोनि । विनम्र भावे तव चरणी । आलो लोळत पतित जरी । शरणांगत मी मज तारी ।।२३।।
आता पाहू नको अंत । तारी मारी नसे खंत । मारशील तर कृपानिधी । होईल ऐसे तरी कधी ।।२४।।

विलंब आता का करसी । कृपा करी जणी मजवरती । अवधूता रे अवधूता । नाही कशाची मज चिंता ।।२५।।
तव चरणी लोळण घेई । प्रसादकण तरी मज देई । योगी तारक पतितांचा । बोला जय रंग अवधूता ।।२६।।

shri rang avadhut maharaj rang bavani
श्री रंग बावनी मराठी

।।अवधूत चिंतन श्री । गुरुदेव दत्त ।।

श्री रंग बावनी मराठी हि महाराज ह्यांना अर्पण केलेली प्रार्थना आहे. हे पठण करून आपणास श्री महाराजांची कृपा लाभावी हि प्रार्थना. सर्वांचे मना पासून धन्यवाद.

Shree Rang Bavani in Marathi is a prayer dedicated to Maharaj. By reciting this prayer, one seeks the blessings of Maharaj. Heartfelt thanks to everyone.

To reach other blogs, click here. Available on blogger as well.

Share this content:

Post Comment